Manoj Jarange Patil’s mother emotional appeal to Maharashtra government on Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांना आता उपोषण करायला लावू नका. त्यांनी लय उपोषणं केली आहेत, आता अवसान राहिले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा अन् महाराष्ट्रातील सर्वांना आरक्षण मिळवून दिले. माझ्या लेकराला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ सरकारने आणू नये. माझ्या लेकाने २५ वर्षे आंदोलन केले. उपोषण केले. सरकारने आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर भावूक झाल्या होत्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्रीला कुटुंबीयांनी भरवले पेढे मातोश्रीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं. या उपोषणाची देखील सरकारने त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करत त्यांच्याकडे जीआर सुपूर्द केला. यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांचे जन्मभूमी असलेल्या मातोरी येथे त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जल्लोष साजरा करत सरकारने आता पहिल्यासारखा दगा फटका करू नये असे म्हटले आहे. आम्ही सरकारचे आभार मानतो तर जरांगे पाटलांच्या मातोश्रीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांना पेढेही भरवण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.