MPSC aspirants protest at Shastri Road demanding age limit relaxation for PSI recruitment, with Manoj Jarange extending support. Saam Tv
Video

MPSC आंदोलनाला मनोज जरांगेंची साथ; PSI वयोमर्यादेवर सरकारविरोधात संताप|VIDEO

MPSC PSI Recruitment Age Limit Controversy: पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांचे आंदोलन तीव्र झाले असून या आंदोलनात मनोज जरांगे यांनी सहभाग घेतला आहे.

Omkar Sonawane

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी होऊनही राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून काही आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आंदोलन थांबवावे लागले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४ जानेवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. जाहिरात येण्यासाठी सात महिने उशीर झाला. त्यामुळे अनेक उमेदवार अपात्र ठरून संधी हिरावली जाणार असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवण्याची, वयोमर्यादा गणना करण्याचा कालावधी १ जानेवारी २०२५ गृहित धरण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे; फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Saturday Horoscope : लाडक्या गणरायाला काजळ लावून नारळ अर्पण करावं; मेषसह ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

महायुती तुटली? शिंदेसेनेची भाजपविरोधात बंडखोरी

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात 546 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT