MANOJ JARANGE CRIES Saam Tv
Video

Manoj Jarange: उपोषण सोडताच मनोज जरांगे धायमोकलून रडले; प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा VIDEO

Manoj Jarange Breaks Down: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर भावूक झाले. आझाद मैदानावर आंदोलकांचा जल्लोष सुरू असताना जरांगेंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

Omkar Sonawane

5 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने 6 मागण्या मान्य केल्या

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडले

उपोषण सोडताच मनोज जरांगे धायमोकलून रडले

आझाद मैदानावर शेकडो आंदोलकांनी विजयोत्सव साजरा केला

मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून उपोषण कऱणारे मनोज जरांगे पाटील भावूक झाले. सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एकीकडे आझाद मैदानावर शेकडो आंदोलक विजयोत्सव साजरा करत होते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. दोन दशकांपासून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केलेय. आपली दोन एकर जमीनही त्यांना विकावी लागली होती. जरांगेंना आपल्या कुटुंबालाही वेळ देता आला नव्हता. आज मागण्या मान्य झाल्या अन् त्यांचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

उपोषण सोडताच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे हे धायमोकलून रडले. गेल्या अनेक वर्षांपासूनच हा लढा सुरू होता. अनेक वेळा जरांगे हे उपोषनाला बसले होते.मागच्या चार दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता. आज अखेर सरकारने त्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी सरकारचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Live News Update : प्रचारादरम्यान पैसे वाटले, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

Love at first sight: या ३ राशींच्या व्यक्तींना पहिल्याच नजरेत होतं प्रेम

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एका निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

SCROLL FOR NEXT