Manikrao Kokate offering prayers at Nandurbar’s Shani Temple amidst political uproar over viral Assembly rummy video. Saam Tv
Video

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

Manikrao Kokate Rummy Video Controversy: राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनि मंदिरात पूजा केली. विधानसभेतील रम्मी व्हिडिओमुळे वादात अडकलेले कोकाटे संकट दूर व्हावे म्हणून शनिदेवाच्या चरणी लीन झालेत.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून म्हणून ओळख आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या दर्शनापासून केले आहे. शनी देव हा राजकीय क्षेत्राचा गुरु असल्याने त्यामुळे अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळत असते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात या शनिश्वराच्या दर्शनाने केली होती. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेट ही दिल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले आहे. संकटात सापडल्यानंतर आणि चारही बाजूंनी टीका होत असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन विरोधकांच्या साडेसातीतून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली आहे. एकूणच वादग्रस्त विधानानंतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात न दिसणारे माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ या ठिकाणी शनी मंदिरात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT