मनसे नेते अमित ठाकरे हे आज नवी मुंबईतील नेरुळ येथे दाखल होणार आहेत. नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सकाळी ११ वाजता उपस्थित राहतील. तसेच, या शिवस्मारकाचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरुळ पोलीस स्थानकात हजर राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेले चार महिने अनावरण झाले नव्हते. याबद्दल मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत या पुतळ्यावरील आवरण हटवून त्याचे अनावरण केले होते. या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे यांनी यापूर्वी नकार दिला होता आणि आपण स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून नोटीस स्वीकारू असे सांगितले होते.