५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या! पुणे पोलिसांच्या "ऑपरेशन उमरती" ची A to Z स्टोरी

Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya Pradesh: पुणे पोलिसांची कामगिरी. मध्य प्रदेशातील उमरती गावात जाऊन अवैध पिस्तूल कारखान्यांवर कारवाई केली आणि ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya Pradesh
Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya PradeshSaam
Published On
Summary
  • मध्य प्रदेशातील उमरती गावात पुणे पोलिसांचे ऑपरेशन

  • पुणे पोलिसांकडून ५० पिस्तूल भट्ट्या उद्ध्वस्त

  • ३६ जणांना अटक

  • २१ अवैध पिस्तुले, काडतुसे आणि साहित्य जप्त

पुणे शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमरती गावातील कारखान्यांवर, पुणे पोलिसांच्या पथकाने पहाटे छापा टाकला आणि तब्बल ५० भट्ट्या उध्वस्त केल्या. या कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात असून त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला.

आज हा सर्व जप्त केलेला साठा आणि आरोपींना पुणे पोलिस आयुक्तालयात आणलं होत. या निमित्ताने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलिस आयुक्त यांनी या मोहिमेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले. ही मोहीम नक्की कशी राबवली गेली? कोणाकोणाची यासाठी मदत लागली आणि कशा पद्धतीने हे "ऑपरेशन उमरती" राबवलं गेलं याबद्दल सुद्धा सांगितलं.

या मोहिमेचे नेतृत्व करणारे पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले, "२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात पिस्तूल जप्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना मध्य प्रदेश मधील उमरती गावातून अनेक पिस्तूल पाठवलं जात आहे असं दिसून आलं. अनेक पिस्तूल वर "यू एस ए" असं लिहिलं होतं, त्याचे ब्रँडिंग केलं होतं. यू एस ए म्हणजे उमरती शिकलगार आर्म असे त्याला म्हणले जात होते. यामुळे हे सिद्ध झालं की या गावातून महाराष्ट्रात हे पिस्तूलं येत आहेत."

Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya Pradesh
'का रे दुरावा!' देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंच्यामध्ये २ खुर्च्यांचं अतंर, नेमकं कारण काय? CMOकडून स्पष्टीकरण

पुढे बोलताना ते म्हणाले, "मध्य प्रदेश मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि या ऑपरेशनसाठी गोपनीयता बाळगली गेली. मध्य प्रदेशच्या आधी जळगाव मार्गे तिथे पोहचण्यासाठी वेगळा मार्ग निवडला होता. विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलिसांच्या गाड्या न वापरता खाजगी गाड्या वापरल्या गेल्या. रात्री ११ वाजता आम्ही त्या गावात पोहचलो होतो आम्हाला अनुभव सांगितलं होतं की तिथे महिला प्रतिकार करतात, दगडफेक करतात. पूर्ण उमरती गावात आम्ही पहाटे ४ वाजता वेढा घातला. उमरती गावात ५० ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं गेलं. मध्य प्रदेश पोलिस आणि जळगाव पोलिसांचा मोठं सहकार्य या ऑपरेशन मध्ये लाभलं."

Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya Pradesh
''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

अमितेश कुमार, पोलिस आयुक्त म्हणाले, "सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. १०५ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झालं आहे. आज सुट्टी असल्याने रोख रक्कम देण्यात आली नाही. उद्या प्रत्येकेला रोख रक्कम बक्षीस स्वरुपी दिली जाईल.

पुढे ते म्हणाले, "पिस्तूल बनवण्याचे स्रोत जे आहे आणि जिथून सप्लाय होतात हे पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय आम्ही १५ दिवसांपूर्वी केला होता. उमरती गावाची भौगोलिक स्थिती पाहता तिथे स्थानिकांचा अशा लोकांना पाठिंबा होता अशी माहिती आम्हाला होती. कोणत्याही परिस्थितीत उमरती मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, आम्हाला वाटलं होतं तिथे बदला आणि आमच्यावर हल्ला होईल अशी अपेक्षा होती पण आमची सगळी तयारी होती. अटक केलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात येईल तसेच पुण्यातील अनेक गँग सदस्य चे या उमरती गावाचे संबंध दिसून आले आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे."

Pune Police Bust Illegal Pistol Factories in Madhya Pradesh
ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, रिक्षा चालकाला मारहाण अन् दमदाटी

शरद मोहोळ हत्येत वापरलेलं पिस्तूल सुद्धा उमरती गावातले

५ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून झाला होता. पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा भागात त्याच्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोळीबार झाला आणि उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला होता. १५ पेक्षा अधिक जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अनेक जणं सध्या जेल मध्ये असले तरी या घटनेबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याच्या हत्येत वापरली जाणारे पिस्तूल हे याच मध्य प्रदेशच्या उमरती गावातून आणले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशच्या उमरती गावात जाऊन अनधिकृत पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त केल्याप्रकरणी आज १०५ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलताना म्हणाले, अनेक पिस्तुलं जप्त करण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा पुण्यात आणले गेलेले पिस्तुल हे याच गावातून आणली गेली. शरद मोहोळ याच्या हत्येत जे पिस्तूल आरोपींनी वापरले होते ते सुद्धा याच उमरती गावातून विकत आणले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com