manikrao kokate arrest warrant saam tv
Video

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

Manikrao Kokate Arrest warrant issue : माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं असून, त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी, कोकाटे हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

Nandkumar Joshi

महायुती सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाले आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, कोकाटे हे सध्या रुग्णालयात दाखल असून, उपचार घेत असल्याची माहिती समजते. शरण येण्यासाठी कोकाटे यांनी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे.

१९९५ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात कोकाटे यांना कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. सध्या माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल असून, उपचार घेत असल्याची माहिती समजते.

वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. कोकाटेंच्या वतीने वकील मनोज पिंगळे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. कोकाटे हे मंत्रिपदावर आहेत. सध्या ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे अटक वॉरंट काढण्याऐवजी त्यांना सरेंडर होण्यासाठी चार दिवसांचा वेळ द्यावा, असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं. न्यायालयाचा या युक्तिवादावर समाधान झाले नाही. त्यानंतर न्यायालयानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-ord Sets: ऑफिस आणि कॉलेज वेअरसाठी ट्राय करा कम्फर्टेबल आणि ट्रेंडी को-ऑर्ड सेट्स, तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Diet Tips: वजन कमी करण्यासाठी कोणती पोळी खावी?

अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

SCROLL FOR NEXT