Manikrao Kokate Praising Amol Mitkari During Akot NCP Rally Saam Tv
Video

Maharashtra Politics: अमोल मिटकरी माझे 'गुरु', त्यांच्यामुळेच विधानसभेला काठावर निवडून आलो - माणिकराव कोकाटे|VIDEO

Amol Mitkari: अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माणिकराव कोकाटे यांनी अमोल मिटकरींचे 'गुरु' म्हणून स्तुतिसुमन उधळली.

Omkar Sonawane

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नावं माणिकराव कोकाटे आणि अमोल मिटकरी. एक पक्षाचा मंत्री.. तर दुसरा पक्षाचा आमदार... मात्र, दोघांनाही जोडणारा एक सामायिक धागा म्हणजे त्यांची वादग्रस्त वक्तव्य... आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे दोन्हीही नेते एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्य होतंय अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं. अकोट शहरातील झुनझूनवाला सभागृहात अकोला जिल्ह्याचा पक्ष कार्यकर्ता आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय.

या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार अमोल मिटकरींची तोंडभरून स्तुती केलीय. एव्हढेच नव्हे तर अमोल मिटकरी आपले 'गुरु' असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणालेय. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी आपल्या मतदारसंघातून सभा घेतल्यानेच आपण 3 हजार मताने का होईना, मात्र काठावर निवडून आल्याचं कोकाटे म्हटलये. दोघांचंही दुखणं सांगताना माणिकराव कोकाटे म्हणालेत की, बोलणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात. मात्र, आपण आता आणि भविष्यातही अमोल मिटकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले.

दरम्यान, माणिकराव कोकाटे गेली पाच टर्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांतून विधानसभेवर निवडून येत आहेत.‌ तर अमोल मिटकरी पहिल्यांदाच विधान परिषदेचे आमदार बनले. त्यातच कोकाटे यांनी मिटकरींना गुरु म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येनं निवडून द्या. अजित पवारांचे हात बळकट करा, असं आवाहनही यावेळी माणिकराव कोकाटे यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

SCROLL FOR NEXT