SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. SRPF च्या परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न एकाच पुस्तकातील प्रश्न घेण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या्प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. पेपर फुटीचा मुख्य आरोपी समोर आला आहे. युनिटचा समदेशक तुषार पाटील मुख्य दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. SRPF घोटाळ्यासंदर्भात अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवण्यात येणार आहे.
राज्य राखीव पोलीस भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेण्यात आले होते. यानंतर उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी परीक्षा रद्द केली होती. आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.