Mumbai-Pune Expressway Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ३ तासांसाठी बंद, प्रवाशांनो 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Mumbai-Pune Expressway Traffic Closed: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज आणि उद्या ३ तासांसाठी बंद राहणार आहे. प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

Priya More

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील कुसगाव येथील मिंसिंग लिंकजवळील पुलाच्या रंगरगोटी आणि डागडूजीच्या कामामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक ३ तासांकरीता बंद ठेवण्यात आली आहे. कामादरम्यान अनुचीत प्रकार टाळण्यासाठी महामार्ग पोलिस तसेच MSRDC यांनी हे खबरदारीचा पाऊल उचललं आहे. दरम्यानच्या काळात प्रवाशांना मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून जुन्या मुंबई- पुणे महामार्गाने वाहतूक ड्रायव्हर्ट करण्यात आलेली आहे.

एक्सप्रेस वेवरील ९४ किलोमीटर किवळे चौक या ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आला असून प्रवाशांना पुढे देहू रोड तळेगाव कामशेत लोणावळा मार्गे मुंबईचा प्रवास करता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उद्या मात्र मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेस वेवर लोणावळा या ठिकाणी थांबवून ती पुढे जुन्या मुंबई- पुणे महामार्गाने कार्ला ,कामशेत वडगाव ,देहूरोडच्या दिशेने पुढे पुण्याकडे मार्गस्थ करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत ज्वेलर्सला लुटण्याचा प्रयत्न फसला, 24 तासात 3 आरोपी जेरबंद

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT