eknath shinde. x
Video

शिंदेंना ठाण्यात जबरी धक्का, उमदेवारी अर्ज भरण्याआधी ४ माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र

Eknath Shinde Thane political setback : ठाण्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंब्र्यातील चार माजी नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Shiv Sena Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यामध्ये मोठा धक्का बसलाय. उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याआधी काही तास ४ माजी नगरसेवकांनी जय महाराष्ट्र केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे मुंब्र्यातील चार नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राजन किने, अनिता किने ,मोरेश्वर किने या सर्व माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा शिवसेना शाखेचा वादामध्ये राजन किने यांचा मोठा सहभाग होता. मुंब्रा मध्ये शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंब्रातील राजकीय खेळी बदलण्याची शक्यता.

राष्ट्रवादीच्या या स्वबळाच्या राजकीय खेळीमुळे आतापर्यंत भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसे अशा सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कौल हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे वाढताना दिसून येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car battery life: कारची बॅटरी किती वर्ष चालते? जाणून घ्या कधी बदलावी?

Maharashtra News Live Update: बीड शहरातील जुना धानोरा रोड भागातील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

SCROLL FOR NEXT