mahayuti seat sharing formula for maharashtra election saam tv
Video

Mahayuti Formula : 153 - 80 - 55 ; महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात, शिंदे गटाला किती जागा?

Mahayuti seat sharing formula : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?

Nandkumar Joshi

गणेश कवडे, मुंबई, साम टीव्ही

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलं आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातही वरिष्ठ नेत्यांकडून जागावाटपाचा हा पेच सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तो अद्याप सुटलेला दिसत नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ आली आहे, पण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचं काही जुळून येत नाही. दोन्ही बाजूने फॉर्म्युला सांगितला जात आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होत नाही. आता महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप १५३, शिवसेना (शिंदे गट) ८० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५५ जागांवर लढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पण हा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला असला तरी, तो अंतिम झालेला नाही, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नुकतीच भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात २२ मतदारसंघांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

SCROLL FOR NEXT