Vai Vidhansabha SaamTv
Video

Wai Constituency : वाई मतदारसंघात युतीचं टेंशन वाढलं; महायुतीत आणखी एका बंडखोरीची शक्यता

Rebellion In Mahayuti : साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यावर महायुतीकडून काय पाऊल उचललं जात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. वाई मधून महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी थेट शरद पवार यांच्या गटात जाऊन उमेदवारी मागण्याची तयारी सुरू केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढवून जिंकून येईल असा विश्वास तयांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी बंडखोरी केली तर महायुतीचं टेंशन वाढणार आहे. आता जाधव यांची नाराजी महायुती कशी दूर करणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT