Satara News SaamTv
Video

VIDEO : कोरेगाव मतदारसंघात राडा! कार्यकर्त्याच्या मोबाईल स्टेटसवरून महायुती आणि मविआमध्ये तू तू मैं मैं

Koregaon Assembly Constituency : कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्याच्या मोबाईल स्टेटसवरून महेश शिंदे आणि शशिकांत शिंदे यांच्यात चांगलाच वाद झाल्याचं बघायला मिळल आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.

Saam Tv

ऐन निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्व ठिकाणी सुरू असून महायुतीचे उमेदवार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचारात व्यस्त आहेत. मात्र अलीकडच्या काळात दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या बाबत एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून या मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात संबंधित युवकावर महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते केला आहे. त्यानंतर आज पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन शशिकांत शिंदे यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे पुसेगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: किचनमध्ये झाडं लावणे योग्य की अयोग्य; वाचा काय सांगते वास्तुशास्त्र

Healthy Life: हेल्दी राहण्यासाठी आहारात करा 'या' फायबरयुक्त पदार्थांचा समावेश

IND vs SA: पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा खतरनाक ऑलराऊंडर पदार्पण करणार

Old Clothes: जुने कपडे दुसऱ्यांना देतायत?तर या वास्तू टीप्स फॉ़लो करा, अन्यथा...

Sonakshi Sinha: सोनाक्षीच्या लाल ड्रेसने चाहत्यांना केलं घायाळ; सिंपल लूकची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT