Ministry Seats Distrubution SaamTv
Video

State Cabinet Ministry : मंत्रिमंडळात महिला आमदारांची लागणार वर्णी? या महिला आमदारांची नावं चर्चेत

Mahayuti News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या प्रभावानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळात देखील महिला आमदारांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

नव्या सरकमध्ये 4 महिलांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून यंदा विधानसभेवर १४, राष्ट्रवादीच्या ४ तर शिवसेनाकडून २ महिला आमदार विधानसभेवर जाण्याची शक्यता आहे. मागच्या २ टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मंत्री पद देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळाला आहे. त्यांतर आता केंद्र देखील राज्यातून चार महिलांची मंत्रिपदी वर्णी लावण्याची शक्यता आहे. त्यासाठी महिला आमदारांचे प्रोफाइल देखील मागवण्यात आले आहेत. यंदा विधानसभेवर भाजपकडून १४, राष्ट्रवादीच्या ४ तर शिवसेनाकडून २ महिला आमदार निवडून गेलेल्या आहेत. त्याचमुळे आता यांच्यातून कोणत्या चार महिला आमदारांची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यात अदिती तटकरे, पंकजा मुंडे, मनीषा कायंदे, माधुरी मिसाळ, भावना गवळी, देवयानी फरांदे, श्वेता महाले या महिला आमदारांची नावे मंत्री पदासाठी चर्चेत आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT