Mahayuti Faces Fresh Rift in Konkan साम टीव्ही मराठी
Video

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

रायगडचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तटकरे यांना विरोध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी महायुतीत नवा राजकीय तिढा निर्माण केला आहे.

Namdeo Kumbhar

Mahendra Dalavi Ratnagiri News : रायगडमधील शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषद निवडणुकीत कोकणाची जागा महायुतीमध्ये कुणाला सुटणार? याची चर्चा सुरू असतानाच जुईली दळवी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत. त्यांनी कायम अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात? तटकरेंना आमचा विरोध आहे, जर अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही. आम्ही तटस्थ भूमिका घेऊ असा इशारा यावेळी जुईली दळवी यांनी दिला.

तटकरेंनी दिलेला शब्द कधीच पाळत नसल्याचा थेट आरोप यावेळी दळवी यांनी केला. कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी जुईली दळवी यांनी बोलून दाखवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update:विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT