zp election in maharashtra 2026  Saam TV marathi news
Video

Zilla Parishad election date : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट, वाचा नेमका कधी उडणार धुरळा

Maharashtra Zilla Parishad election date 2026 : राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादेत असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

राज्यात 29 महापालिकांच्या रणधुमाळीसोबतच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे न्यायालयाचे निर्देश असून, 21जानेवारीच्या सुनावणीनंतर उर्वरित जागांबाबत निर्णय होईल. सध्या प्रशासकीय यंत्रणा महापालिका कामांत व्यस्त असल्याने या निवडणुका त्यानंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तर ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदेचा निर्णय २१ जानेवारीनंतरच घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेय. बारावीच्या परीक्षेच्या आधी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितलेय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT