Postman Saam Tv
Video

Postman: पोस्टमनच्याच घरात टपालाची ३ पोती, हजारो पत्रे धूळखात पडलेली, महाराष्ट्रात खळबळ

Yavatmal Postman News: यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोस्टमनच्या घरातच टपालाची तीन पोती सापडली आहेत. त्याच्या घरातच अनेकांची हजोरो पत्रे सापडली.

Siddhi Hande

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पोस्टमनच्या घरी जवळपास हजारो पत्रे सापडली आहेत. डाक विभागाचा गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. पोस्टमन सतीश धुर्वेने अनेकांची पत्रे त्यांना न देता आपल्या घरीच ठेवली आहेत. पत्र किंवा पार्सल न मिळाल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होते. यामुळे पोस्टमनच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घरातून टपालाने भरलेली तब्बल पत्रांची तीन पोती ताब्यात घेण्यात आली. या प्रकारामुळे नोकरीची कॉल लेटर्स, पेन्शन कागदपत्रे आणि धनादेश अडकले असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबंधित पोस्टमनवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT