Maharashtra TB high risk villages latest news saam
Video

महाराष्ट्रावर आता टीबीचं मोठं संकट, ११ हजार गावं हाय रिस्कवर, धक्कादायक वास्तव समोर

Latest health alerts in Maharashtra : महाराष्ट्रात टीबीचा धोका वाढला असून ११ हजारांहून अधिक गावे हाय रिस्कवर आहेत. १०० दिवसांच्या मोहिमेत हजारो नवे रुग्ण आढळले.

Namdeo Kumbhar

TB Disease | Health Alert : राज्यातील सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, महाराष्ट्राला टीबीचा विळखा बसलाय आहे. राज्यातील ११ हजारांपेक्षा जास्त गावे हाय रिस्कवर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका विशेष मोहिमेत हे वास्तव समोर आले आहे. Maharashtra TB high risk villages latest news

महाराष्ट्रावर आता टीबीचं मोठं संकट घोंघावतंय. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. राज्यातील तब्बल 11 हजार गावं हाय रिस्कवर आहेत. त्यामुळे जवळपास दीड कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. अवघ्या 35 दिवसांत 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर पडली आहे. प्रशासनानं 14 वर्षांवरील प्रत्येकाची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यातील सुमारे १.५ कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जोखीमग्रस्त भागातील १४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीची अनिवार्यपणे तपासणी केली जाणार आहे. २४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६,१११ नवे रुग्ण आढळले असून त्यांची नोंद 'निक्षय' (Ni-kshay) पोर्टलवर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

SCROLL FOR NEXT