गटारी स्पेशल! घरी अर्ध्या तासात बनवा चटपटीत आणि कुरकुरीत 'पनीर कबाब'

Manasvi Choudhary

पनीर कबाब

गटारीनिमित्त काहीतरी चटपटीत आणि स्वादिष्ट बनवायचा विचार करत असाल तर पनीर कबाब ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.

Paneer Kabab Recipe

चविष्ट रेसिपी

पनीर कबाब ही रेसिपी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.

homemade paneer kabab

साहित्य

पनीर, उकडलेले बटाटे, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, कॉर्नफ्लॉअर, मसाला, जिरे-धने पावडर, ब्रेड क्रम्स, तेल, मीठ हे साहित्य एकत्र करा.

paneer kabab

मिश्रण तयार करा

पनीर कबाब बनवण्यासाठी सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेला उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर एकत्र करा.

Paneer | pinterest

मसाले मिक्स करा

या मिश्रणात गरम मसाला, चाट मसाला, जिरे-धने पूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रण घट्ट करण्यासाठी त्यात कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन आणि थोडे ब्रेड क्रम्स घालून सर्व साहित्य मिक्स करा.

spices | pinterest

कबाबचा शेप द्या

हाताला थोडे तेल किंवा पाणी लावून या मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. त्यांना तुमच्या आवडीनुसार कबाबचा आकार द्या.

Paneer Kabab

कोटिंग करा

तयार केलेले कबाब बाहेरून अधिक कुरकुरीत होण्यासाठी ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करा.

Paneer Kabab

शॅलो फ्राय करा

नॉन-स्टिक पॅनमध्ये गरम तेलामध्ये किंवा बटरमध्ये मध्यम आचेवर कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्या.

Paneer Kabab

NEXT: मुलांच्या क्रिएटिव्हिटीला द्या पंख, १५ ऑगस्टनिमित्त घरी आणि शाळेत बनवा सुंदर 5 क्राफ्ट

15 AUGUST DIY CRAFT IDEAS FOR KIDS
येथे क्लिक करा..