Uddhav-Raj Thackeray Saam Tv
Video

Uddhav-Raj Thackeray: बंधूभेट! मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा VIDEO

Uddhav-Raj Thackeray Video: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत. २०१२ नंतर ते पहिल्यांदाच मातोश्रीवर आलेत. या ठाकरे बंधुना एकत्र पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरे बंधुंना पुन्हा एकत्र बघण्याची संधी जनतेला मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर एकाच मंचावर येताना पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मातोश्रीवर आनंदाचे वातावरण आहे. २०१२ नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. अशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा होणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT