Sakshi Sunil Jadhav
भारतात सप्टेंबरपासून महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
पावसाच्या यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागात अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
आपत्तीजन्य परिस्थितीमुळे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मधील मासिक सरासरी पाऊस दीर्घकालीन सरासरी १६७.९ च्या १०९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
बहुतांश प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे.
ईशान्य आणि पुर्व भारतातला काही भाग, दक्षिणेकडील काही ठिकाणे, उत्तर- पश्चिम भारतातील काही ठिकाणी पाऊस कमी असणार आहे.
उत्तर-पश्चिम भारतातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्थलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. दक्षिण हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थानात अडथळा निर्माण होऊ शकतो.