MLA Sunil Shelke addressing the media in Maval, warning BJP over the Talegaon Dabhade municipal election candidate announcement. Saam Tv
Video

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Maval NCP vs BJP Political Tension: मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांनी “एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन असा इशारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

मावळ तालुक्याच्या राजकारणात आज प्रचंड खळबळ उडाली आहे. “एका मिनिटात तळेगावचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करीन!” या वाक्याने आमदार सुनील शेळके यांनी राजकीय वर्तुळात अक्षरशः बॉम्ब टाकला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये नव्या राजकीय समीकरणांना आता वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार शेळके यांनी भाजपच्या वतीने महायुतीचा उमेदवार म्हणून संतोष दाभाडे यांना पाठिंबा देत नगराध्यक्ष पदाची घोषणा केली होती. मात्र आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की,

मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युतीत एकत्र राहणार नाहीत. दोन्ही पक्ष आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. महायुती आणि समितीचा उमेदवार म्हणून आम्ही संतोष दाभाडे यांना संमती दिली होती; पण जर त्यांनी आमचा प्रस्ताव नाकारला, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.”

या वक्तव्यानंतर मावळच्या राजकारणात चर्चा रंगली आहे की, आमदार शेळके आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांपैकी कोणाचा नाव पुढे करणार? कोण होईल तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदाचा त्यांचा उमेदवार?

राजकीय पातळीवर भाजप-राष्ट्रवादी युती तुटण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. संतोष दाभाडे यांच्या उमेदवारीला भाजपकडून अधिकृत मान्यता मिळाल्यास, शेळके यांनी दिलेला इशारा गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो.

मावळ मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासूनच निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आपली संघटना मजबूत करत आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपही स्वतंत्र ताकद दाखविण्याच्या तयारीत आहे.

तळेगाव दाभाडे नगरपालिका निवडणुकीचा मुख्य राजकीय रंगमंच ठरणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, आमदार शेळके यांचा हा निर्णय मावळातील समीकरणे पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल. पुढील २४ तासांत कोण उमेदवार म्हणून पुढे येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT