eknath shinde  Saam tv
Video

Maharashtra Politics: डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा, शिंदेंच्या आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

Santosh Bangar Slams Shinde Sena Ministers: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. अशा मंत्र्यांना घरी बसवा, असे विधान त्यांनी केले.

Priya More

नांदेडमधील शिदेसेनेच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगरांनी पक्षाला घरचा आहेर दिला. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीय, डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या समोरच त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

शिंदेसेनेच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नांदेड शहरात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी बांगर यांनी केली. ही मागणी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT