Deputy CM Eknath Shinde and Minister Ganesh Naik likely to face each other at the OBC meeting in Mumbai. Saam Tv
Video

Maharashtra Politics: उद्याची ओबीसी बैठक वादळी ठरणार? दोन राजकीय विरोधक आमने सामने येणार|VIDEO

Eknath Shinde And Ganesh Naik Clash: मुंबईत उद्या होणारी ओबीसी समाजाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आमनेसामने येणार असून या दोन्ही नेत्यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

मुंबईत उद्या होणाऱ्या ओबीसी समाजाच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाच्या बैठकीला दोघेही उपस्थित राहणार आहेत. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर नवी मुंबईची वाट लागेल असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे आणि नाईक उद्या आमनेसामने येणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा सर्वश्रृत आहे. एका कार्यक्रमात नाईक यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली होती. आम्हाला ती 14 गावे आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर ही सर्व गांव आपण बाहेर काढू. निश्चित सर्व गाव निघतील, असा दावा त्यांनी केला. जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेली तर या शहराचे वाटोळे झाले म्हणायचे असा हल्लाबोल गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता.

अशातच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे उद्या ओबीसी बैठकीला समोर येत असल्याने ही बैठक वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Crime News: बंद घरात सापडला MBA विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह; परिसरात खळबळ

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

SCROLL FOR NEXT