Vijay Wadettiwar On Supriya Sule: Saam Tv
Video

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे यांचं नाव अनावधानाने घेतलं, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला खेद

Vijay Wadettiwar On Supriya Sule: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे राजकारण तापले होते.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबल उडाली. या विधानानंतर राजकारण तापल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाबाबत खेद व्यक्त केला. ओबीसी प्रमाणपत्राबाबत भूमिका मांडताना सुप्रिया सुळेंचे नाव अनावधानाने आल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला.

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्राबाबत बोलताना खळबळजनक दावा केला होता. 'राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे.', असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत 'काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं.', असे म्हणाल्या होत्या. त्याचसोबत त्यांनी काँग्रेसवर आरोप देखील केला होता. 'रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करत आहे? याबाबत मला आश्चर्य वाटत आहे. काँग्रेस पक्षाकडून मला दररोज टार्गेट केले जात आहे.', असे त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT