Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानसभेसाठी कॉंग्रेस मुंबईत किती जागा लढवणार? पाहा VIDEO

Congress Will Contest 13 To 15 Seats In Mumbai: विधानसभेसाठी कॉंग्रेस मुंबईत १३ ते १५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. आता या जागावाटपावरून महाविकास आघाडीत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Rohini Gudaghe

मुंबई: कॉंग्रेस विधानसभेच्या १३ ते १५ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांकडून मिळत आहे. कॉंग्रेस मुंबईत विधानसभेसाठी अधिकच्या जागा मागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जागांमध्ये कुलाबा, मुंबा देवी, वडाळा, भायखळा, बांद्रा पूर्व, चांदीवली, अंधेरी पश्चिम, सायन कोळीवाडा, धारावी, बांद्रा,वर्सोवा, मालाड पश्चिम आणि जोगेश्वरीचा समावेश आहे. तर शरद पवार गट देखीलमुंबईत ८ ते ९ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नेमका काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना अधिकच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर आगामी निवडणुकीत कॉंग्रेसच्या फुटीर आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मतदारसंघातून विधानसभेसाठी कॉंग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या आमदारांची धाकधूक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BPCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १,६२,९०० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप! थेट वाहतूक विभागाच्या डीसीपींच्या गाडीला धडक; मुलगी जखमी

Mrunal-Bipasha: मृणाल बिपाशाच्या वादात हिना खानची एन्ट्री; अभिनेत्री म्हणाली, 'मी अशा चुका केल्या...'

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

SCROLL FOR NEXT