Maharashtra News Saam Tv
Video

Manoj Jarange Patil : "मराठ्यांना मूर्ख बनवू नका" प्रकाश आंबेडकरांची आंदोलनाआधी मनोज जरांगेंवर टीका

Maratha Reservation : मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारविरोधात त्यांची आक्रमक भूमिका कायम आहे. प्रकाश आंबेडकरांनी या आंदोलनावर टीका करत गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असे म्हटले आहे.

Alisha Khedekar

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणा आहेत. यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण राज्यातील सरकारसुध्दा उलथून टाकू शकतो, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सोमवारी दिला. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली पोस्ट चर्चेत आलीय. या पोस्टमध्ये त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल भाष्य करत गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असे म्हटलंय.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले," मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.

तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?" असे म्हणाले. दरम्यान आता जनतेचे लक्ष २९ ऑगस्टच्या मराठा आंदोलनाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन, ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Butter Chakli Recipe: घरच्या घरी बनवा कुरकुरीत बटर चकली, १० मिनिटांत तयार होईल रेसिपी

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची प्रकृती बिघडली; फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

Akash Kandil Meaning In English: आकाशकंदीलला इंग्रजीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांनाच माहितच नाही

Calcium Deficiency Women: महिलांनो, ही ६ लक्षणे दिसतायेत? वेळीच उपचार करा, अन्यथा गंभीर आजार झाला म्हणून समजा

SCROLL FOR NEXT