pandharpur news  saam tv
Video

Maharashtra Politics: छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झाले तरी...; माणिकराव कोकाटेंची बोचरी टीका|VIDEO

Chhagan Bhujbal as PM? छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय ते पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू असा उपरोधिक टोला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज लगावला.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर छगन भुजबळ हे तीसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान केले होते. त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनीही छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचे स्वागत करू असा उपरोधिक टोला लगावला. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पवार यांच्या टिकेकडे जास्त लक्ष देत नाही. मी पूर्वी पासूनच कोट घालतो. शेतकर्यांचे राहणीमान व आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी कोट घालावा असं मला वाटते. रोहित पवारांना ही कोट घालायला देऊ असं कोकाटे यांनी म्हटले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हे माहित नाही. वरिष्ठचं याबाबत निर्णय घेतील.सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नसल्याचे ही मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Mumbai 26th July : मुंबईकरांनो सावधान! पुन्हा २६ जुलैचा धोका, समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर लाडक्या भावांचा डल्ला, तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला महिन्याला १५०० रुपयांचा लाभ

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

SCROLL FOR NEXT