EVM Controversy Erupts in Ambernath Saam Tv
Video

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

EVM Controversy Erupts in Ambernath: अंबरनाथमध्ये मतदानादरम्यान जोरदार राडा झाला. ईव्हीएम आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड सापडले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर गोंधळाचे वातावरण आहे. शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत.

Priya More

अंबरनाथमध्ये मतदानादरम्यान गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयकार्ड सापडले. या प्रभागातील सर्व उमेदवारांनी आक्षेप घेतला. अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक २९ मध्ये हा अजब प्रकार घडला. या ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड सापडले आहे. या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे दुसरे मशीन मागवण्यात आले. मात्र जे कर्मचारी मशीन घेऊन आले त्यांच्या आयकार्डवर फोटो आणि नाव तसंच सही आणि शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. सध्या मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण असून उमदेवार आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तर, अंबरनाथ कोहोज गाव येथील फादर एंजल्स स्कूल येथे काही पक्षांच्या गाड्या आत पाठवल्या जात असल्याने शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. लागलीच पोलिसांनी मदत करून सर्वांना येथून बाहेर काढल्याने वाद सध्या तरी मिटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती, स्वतः अजित पवार घेणार मुलाखती

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT