Babajani Durani Saam Tv
Video

Maharashtra Politics: बाबाजानी दुर्राणी खरंच काँग्रेसमध्ये जाणार का? चर्चांनंतर स्वत:च खरं काय ते सांगितलं

Babajani Durani: परभणीमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाची साथ सोडली असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ७ ऑगस्टला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गळती लागली आहे. एकापोठापाठ एक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकत आहेत. शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यापाठोपाठ आता शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे देखील शरद पवारांची साथ सोडणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी बाबाजानी मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी बाबाजानी मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 'देशपातळीवर काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात लढत असल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सर्व पदाधिकाऱ्यांसह आपण काँग्रेस प्रवेश करणार असून येत्या काळात काँग्रेस वाढविण्यावर भर देणार.', असल्याचे बाबाजानी यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीत ही त्यांनी पाथरी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे मागच्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र ऐन वेळी हा पक्ष प्रवेश झाला नाही. त्यानंतर आता बाबाजानी यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे परभणीमध्ये काँग्रेसची ताकद चांगलीच वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT