anjali damania Saam Tv
Video

Anjali Damania: कुणाल कामरा प्रकरणानंतर अंजली दमानियांचा शिंदेंवर हल्लाबोल, VIDEO

Anjali Damania criticizes: द हॅबिटॅट स्टुडिओची भरपाई एकनाथ शिंदेनी भरून दिली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी केली आहे.

Omkar Sonawane

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केल्यानंतर शिंदेंच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या शोच्या ठिकाणी तोडफोड केली. यावर अंजली दमानिया यांनी ट्विट करत आपले सडेतोड मत व्यक्त केले आहे. सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये जाऊन शिवीगाळ करणं व त्या हॉटेलची तोडफोड करणे याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

तसेच या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे. दमानिया म्हणाल्या, कुणाल कामरा जे म्हणाले ते जर आवडलं नसेल तर त्यांच्याविरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे. पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा, आधी शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर FIR झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT