Neelam Gorhe Sanjay Raut and Chandrashekhar Bawankule saam tv
Video

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकांआधी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? VIDEO

Mahayuti Split before Elections : राज्यातील मिनी विधानसभा निवडणुका समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रात अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला धूळ चारून भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट यांची महायुती सत्तेत आली. आता मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तयारीला सर्वच प्रमुख राजकीय पक्ष लागले आहेत. भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महायुती होणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. त्यात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते महायुतीबाबत वेगवेगळी वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकांआधी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

युतीबाबत नीलम गोऱ्हे यांनी अलीकडेच एक विधान केलं. त्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला आहे. नंतरच्या काळात युती होईल की नाही हा प्रश्न मला पडत नाही. मुंबई, ठाण्यात युती होईल, पण बाकीच्या ठिकाणी युती होणं अवघड होईल. झालीच तर आनंद आहे, असं गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

तर त्यांच्या वक्तव्याला बावनकुळे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांचं म्हणणं काय चूक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वांना वाटते की आम्ही लढलो पाहिजे. आमची भावना काय आहे महायुती झाली पाहिजे, महायुतीचा महापौर असला पाहिजे, पण ज्या ठिकाणी होत नाही, त्या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होतील, असे बावनकुळे म्हणाले. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीकास्त्र सोडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

Lip Care Tips: जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात का? जाणून घ्या या मागील सत्य

Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेत्याची तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी; नेटकरी भडकले, व्हिडिओ व्हायरल

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

SCROLL FOR NEXT