Sanjay Raut SaamTv
Video

Sanjay Raut : एकनाथ शिंदे रूसले होते, तेव्हाच हा 'उदय' होणार होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा | VIDEO

Sanjay Raut Statement : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदेसेनेबद्दल मोठा दावा केला आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

Saam Tv

कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला आहे. शिंदेंच्या शिवसेनेची गरज संपली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा, वडेट्टीवार यांनी केला आहे. याच विधानाला संजय राऊत यांनी दुजोरा देत आणखी मोठा दावाही केला आहे. उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.

उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणलं, आता त्यांना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याच्या शिवसेनेचा नवा, तिसरा उदय तुम्हाला दिसेल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. आज पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे शपथविधीच्यावेळी रूसले होते. तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हे निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची, असा मोठा दावाच आता संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT