Uddhav Thackeray Saam Tv
Video

MLC Eletion: मोठी बातमी! ऐनवेळी निवडणुकीतून माघार, ठाकरेंनी थेट अ‍ॅक्शन घेतली

Maharashtra Politics Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने अधिकृत उमेदवाराविरोधात कारवाई केली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली.

Priya More

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाने नेते बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. बाळ माने यांच्या हकालपट्टीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पक्षविरोधी भूमिका आणि अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना नेते सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला होता. पण आता त्यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. बाळ माने यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळ माने यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT