Eknath SHinde vs uddhav thackeray Saam TV Marathi News
Video

उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला, राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Slam Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरेंवरच शिंदेंचा जीव वाचला, असे राऊत म्हणाले.

Namdeo Kumbhar

Maharashtra politics latest news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युउत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंमुळे शिंदेंचा जीव वाचला' असं म्हणत त्यांनी शिंदेंवर पलटवार केलाय.. वर्क फ्रॉम होमवाल्यांमुळं मिसिंग लिंकचं काम रखडलं. अशी टीका शिंदेंनी केली होती, त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलंय.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कामगिरीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचा जीव वाचवणं हे त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं. कोविड काळात एकनाथ शिंदेचा सुद्धा जीव वाचला, असे म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला. कोरोनाच्या काळात माणसांचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. असं आव्हान कोणत्याही मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. झाडं तोडणं, रस्ते बांधणं हे केव्हाही होऊ शकतं; पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान ठाकरेंसमोर होते, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT