Heavy Rainfall  Saam TV
Video

Cyclone Shakti : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर नवं संकट, IMD कडून चक्रीवादळाचा इशारा, अतिवृष्टी होणार

Cyclone Shakti IMD alert Maharashtra : महाराष्ट्रावर शक्ती चक्रीवादळाचं संकट आले असून IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता.

Namdeo Kumbhar

Maharashtra floods and cyclone Shakti impact : पूराने होरपळलेल्या महाराष्ट्रावर शक्ती वादळाचं संकट घोंगावत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय... 7 ऑक्टोंबरपर्यंत शक्ती वादळ धडकण्याची शक्यता आहे...त्यामुळे मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे..मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावं असं आवाहनही प्रशासनाकडून कऱण्यात आलंय.

दरम्यान, मागील दोन महिन्यात राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यात पावसाने होत्याचे नव्हते केले. बीड, धाराशिव, लातूर, जालना या दुष्काळी भागात पूरस्थिती निर्माण झाली. ओला दुष्काळ जाहीर कऱण्याच्या मागणीने जोर धरला आहे. यामधून शेतकरी अद्याप सावरलेला नाही, तोपर्यंत चक्रीवादळाचे नवे संकट ओढावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव शासकीय रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, बेदम मारहाणीत डॉक्टर रक्तबबाळं

Nagpur : नागपुरातील बिझनेसमन अन् पत्नीचा इटलीत मृत्यू, फिरायला गेल्यावर काळाचा घाला

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८७०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Waterfront Indie Film Festival: 'वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल'ला सुरूवात, नवोदित कलाकारांना मिळणार मोठी संधी

Shocking: भयानक घटना! सिनेमात काम देण्याचं आमिष, १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, १८ महिने बलात्कार

SCROLL FOR NEXT