उद्यापासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यात उद्या सर्व आमदारांना शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी विधानभवनात शपथविधीची तयारी करण्यात आली आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उद्यापासून 288 आमदारांना शपथ दिली जाणार आहे. नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतर ही शपथविधीची प्रक्रिया पार पडत आहे. उद्यापासून तीन दिवस 7, 8 आणि 9 डिसेंबरला हे विशेष अधिवेशन होणार आहे. यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना आज राज्यपालांनी शपथ दिली आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्यापासून या 288 आमदारांना शपथ दिली जाणार आहे. सोमवारी हा सर्व शपथविधी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष हा भाजपचा असणार आहे. त्यांनंतर विधानसभा अस्तित्वात येईल. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्याचं नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. आता आमदारांच्या शपथविधी नन्यत्र विधानसभा अस्तित्वात येईल. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानभवनात या विशेष अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आलेला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.