लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मसलगा धरण पूर्णपणे कोरडे पडले असून धरणात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. या धरणावर परिसरातील तब्बल १७ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे येथील नागरिकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या दुष्काळाची दाहकता घराघरात पोहोचवण्याचं काम साम टीव्हीने हाती घेतलं आहे.
एकेकाळी पाण्याने भरलेले असलेले हे धरण सध्या ओसाड पडले आहे. धरणाच्या पात्रात सर्वत्र वाळू आणि काटेरी झुडपे दिसत आहेत. पाण्याऐवजी कोरडी जमीन पाहायला मिळत असल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये धरणाच्या भिंतीला छोटीशी भेग पडली होती. धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यातील पाणी रिकामे करण्यात आले होते. मात्र त्यानंतर धरणाच्या दुरुस्ती आणि पाणी साठवण्याच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या धरणात दरवर्षी सुमारे साडेसात टीएमसी पाणीसाठा होतो. मात्र यंदा धरण कोरडे पडल्याने १७ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून धरणाची दुरुस्ती आणि पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.