Vegetables Price Hike saam TV
Video

Vegetables Price Hike : पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले; ग्राहकांच्या खिशाला कात्री|VIDEO

Vegetables Price Hike : पावसामुळे भाज्यांच्या किमतीत 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.तर काही ठिकाणी किरकोळ बाजारात दर १००% पर्यंत वाढले असल्याचं चित्र दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागांतील भाजीपाला पिकं वाहून गेल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.पावसामुळे भाज्यांच्या किमतीत 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.यासोबतच, पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीची अडचण निर्माण झाली असून, त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाज्यांच्या किमती ५०% पेक्षा अधिक वाढल्या आहेत. काही ठिकाणी किरकोळ बाजारात दर १००% पर्यंत वाढले असल्याचं चित्र दिसत आहे. उदाहरणार्थ, जी कोथिंबीर १० रुपयांना मिळत होती ती आता २० ते २५ रुपयांपर्यंत विकली जात आहे. टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी यांसारख्या भाज्यांचे दर तर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

अचनाक झालेल्या या भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशासा कात्री बसणार आहे. महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पुढील काही दिवस भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार? उद्धव ठाकरेंनी 60 व्या वर्धापन दिनी जाहीर केली भूमिका

शिवसैनिक खचला नाही, उलट पेटलाय; भाजपच आता शिंदेसेनेत विलीन होईल की काय अशी भीती, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात झळकले ठाकरेसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांचे पोस्टर|VIDEO

SCROLL FOR NEXT