Mumbai Rain Alert Saam TV
Video

Monsoon Alert : मुंबईसह कोकणात पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी | VIDEO

Mumbai Rain Alert: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याच्या विविध भागांमध्ये आगामी २४ ते ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या भागांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आणि पुराच्या धोकादायक भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT