Devendra Fadnavis Saam Tv
Video

Devendra Fadnavis: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना 50 लाख रुपयांची मदत- देवेंद्र फडणवीस|VIDEO

Maharashtra Govt Announces ₹50 Lakh: पहलगाम हल्ल्यामध्ये राज्यातील पाच निष्पाप लोकांचा बळी गेला. यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आज राज्य सरकारने त्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

Omkar Sonawane

पहालगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातील पुणे येथील जगदाळे, गणबोटे तसेच डोंबिवली येथील लेले, मोने, जोशी या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर या कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला. या घरातील सर्व करते पुरुष गेल्यामुळे सरकारने या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे.

आज राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली यामध्ये या कुटुंबाला आर्थिक मदत सरकारद्वारे जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहलगाम हल्ल्यात आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतला आहे. यासोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे. दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभा आहे असा संदेश यामार्फत राज्य सरकारने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

SCROLL FOR NEXT