Maharashtra Government Social Media
Video

Maharashtra Politics : महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद; रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा,VIDEO

Maharashtra Political News : सत्ता स्थापनेच्या महिनाभरानंतर पालकमंत्रिपदाच्य़ा नियुक्त्या करण्यात आल्या.. मात्र काही ठिकाणी नियुक्त्यांना स्थगिती देण्याची महायुतीवर नामुष्कीही ओढवली. नेमकं काय झालं महायुतीत? कुणामुळे वाद पेटला? आणि कुणाला मिळणार नवं पालकमंत्रिपद ? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

Vishal Gangurde

ऐकलंत.....गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासांत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावलेंच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलंय.

तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्रिपदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली

नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT