Maharashtra Forms High-Powered Committee for Farmer Debt Waiver After Bachchu Kadu’s Protest Saam Tv
Video

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

Bachchu Kadu Protest Leads To Major Farmer: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सहा महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

Omkar Sonawane

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘उच्चाधिकार समिती’ स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत एकूण ९ सदस्य असतील. त्यात महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागांचे अपर मुख्य सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे अध्यक्ष आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने समितीला सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत समिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन शिफारशी तयार करून सादर करणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना आणि आर्थिक सल्ले दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : राज्यातून गुलाबी थंडी गायब? ऐन हिवाळ्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

SCROLL FOR NEXT