PM Cares Fund SAAM TV
Video

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

PM Cares Fund : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी व पिकांच्या नुकसानीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या पाश्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी व पिकांच्या नुकसानीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची घर आणि पिके पूर्णपणे पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत.या पाश्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.प्रधानमंत्री सहायता योजना म्हणजेच पीएम केअर्स फंड हा एक विशेष निधी आहे, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आला आहे.

देशात नैसर्गिक आपत्ती, आरोग्यविषयक संकटे किंवा इतर गंभीर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, तात्काळ मदत म्हणून या फंडाचा वापर केला जातो. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन पीएम केअर फंडातून आथिक मदत देण्यात यावी, अशी त्यांची भुमिका आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. पीएम केअर फंडातून तब्बल २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावेत, असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

Vande Bharat Train : वंदे भारत चेअर कार आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या

Relationship: अचानक कोणासाठी तरी खास झालात? लव्ह बॉम्बिंग रिलेशन नाही ना? वाचा प्रेमाचा हा नवा ट्रेंड

Onion Export: कांदा उत्पादक शेतकरी संकटात, बांग्लादेशने कांदा आयातीवर लावले निर्बंध| VIDEO

SCROLL FOR NEXT