“₹355 crore relief remains stuck as technical hurdles leave nearly 5 lakh farmers without assistance in Maharashtra.” Saam Tv
Video

शेतकऱ्यांचे ३५५ कोटी अडकले; तब्बल ५ लाख शेतकरी मदतीपासून वंचित|VIDEO

E-KYC Issues Block ₹355 Crore Relief: महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील तब्बल ३५५ कोटी रुपये तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी समस्येमुळे वितरित न होता अडकले आहेत.

Omkar Sonawane

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधील तब्बल ३५५ कोटी रुपयांची मदत अद्यापही सरकारी तिजोरीतच पडून आहे. ई-केवायसी आणि विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यातील जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकलेली नाही. मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिक विभागात ५० कोटी २१ लाख, नागपूरमध्ये ३३ कोटी १ लाख, अमरावतीत ८३ कोटी १ लाख, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६५ कोटी ७२ लाख रुपयांची मदत प्रलंबित आहे. पुण्यात २० कोटी २९ लाख आणि कोकणात ३ कोटी २७ लाख रुपये वितरीत झालेले नाहीत. शासनाने ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते, मात्र तांत्रिक अडचणींमुळे लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

lucky zodiac signs: आज कन्या राशीत चंद्राचा प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी दिवस लकी

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT