शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.  Saam tv
Video

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा शासन निर्णय जारी, फडणवीसांच्या नेतृत्वात विशेष समिती

Maharashtra farmer loan waiver government resolution issued : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

मान्सूनच्या आगमनाची शुभवार्ता महाराष्ट्राच्या शिवारात धडकली असतानाच, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी आनंदवार्ता राज्यातील फडणवीस सरकारनं दिली आहे. शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर त्याचा शासन निर्णय आज, बुधवारी जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या काल, मंगळवारच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली होती. यानंतर आज तातडीने सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि सहकार प्रधान सचिवांचा समावेश आहे. या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया सहकार आयुक्त आणि निबंधक पाहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Mumbai To Akkalkot : स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट जाताय? मुंबईहून जाण्यासाठी पाहा एकदम सोप्पा मार्ग

Maharashtra News Live Update: नंदुरबारच्या सातपुड्यात पावसाची एन्ट्री

रांजणगावातील लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; ATS नं टाकली धाड, ७ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या

शाळा भरण्याआधीच पालकांचं टेन्शन वाढलं; स्कूल बस भाड्यात १५ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT