Electricity workers on strike SAAM TV
Video

Electricity workers on strike : वीज कर्मचारी संपावर, सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडीत ? | VIDEO

Electricity Power : सणासुदीला तुमचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. कारण ९ ऑक्टोबरपासून वीज कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. खाजगीकरणाविरोधात ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बातमी अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या कामाची आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ९ ऑक्टोबरपासून वीज कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील कामांच्या खाजगीकरणा विरोधात ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने देण्याचा, तसेच महापारेषणमधील २०० कोटी रुपयांवरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देण्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या संपामुळे राज्यातील वीज वितरण विस्कळीत होण्याची शक्यता असून सणासुदीच्या काळात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT