राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली आहे.हे ४० तालुके १२ जिल्ह्यातील आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ झाली आहे. या सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांत १२ सवलती मिळणे सुरूच राहील.
- सांगली जिल्ह्यातील खानापूर, पलूस, शिराळा, वाळवा, कडेगाव, विटा आणि तासगाव या ७ तालुक्यांचा समावेश आहे.
- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, सालेकसा आणि गोंदिया या ७ तालुक्यांचा समावेश आहे.
- सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, कराड, कोरेगाव आणि वाई या ५ तालुक्यांचा समावेश आहे.
- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि शिरोळ या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
- वर्धा जिल्ह्यात कारंजा हा एक तालुका या यादीत आहे.
- पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या ३ तालुक्यांचा समावेश आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, मंडणगड आणि खेड या ३ तालुक्यांचा यादीत समावेश आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या ३ तालुक्यांचा समावेश आहे.
- नाशिक जिल्ह्यातील चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि निफाड या ३ तालुक्यांचा यादीत समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.