MNS leader Sandeep Deshpande exposing a PWD engineer allegedly accepting bribe during a sting operation. Saam Tv
Video

राज्याला भ्रष्टाचाराची किड! आधी सत्ताधारी आमदाराचा नोटांच्या बंडलसह व्हिडिओ, आणि आता मनसेकडून PWD च्या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश|VIDEO

Major Corruption Storm:राज्यात दोन मोठे कॅश व्हिडिओ समोर आल्यानं राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेनं पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ तर शिवसेना ठाकरे गटानं आमदार महेंद्र दळवींचा कॅशसोबतचा व्हिडिओ जाहीर केला असून हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार चर्चा होणार आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणात आज कॅश बॉम्बने धमाका केला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसोबत व्हिडिओ समोर आणून एकच खळबळ उडवली. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाच व्हिडिओ समोर आणला आहे. हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या दोन शिलेदारांनी सत्ताधाऱ्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, पीडब्ल्युडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाच व्हिडिओ समोर आणला आहे. 2 लाख 80 हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते. इतकेच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागली जाते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Realme 16 Pro: 200MP चा कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, स्पेशल युवा वर्गासाठी रियलमीने लाँच केली 16 Pro सिरीज

Maharashtra Live News Update: - अहिल्यानगर नावावरून राजकारण तापलं, संग्राम जगतापांचं मुख्यमंत्र्यांसमोर जनतेला आवाहन

Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारीची कारवाई

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, नाराजी अन् पक्षबदलाच्या चर्चेवर मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूचक विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT